प्रसाद कुमठेकर हे नाव मराठी कथात्मक साहित्यात अधिकाधिक ठळक होत आहे. त्यांचे कादंबरी आणि ललित गद्यात्मक लेखन लक्षणीय ठरले आहे. आशयाविष्काराची नवी घडण त्यांच्या लेखनात आहे. 'बगळा', 'बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या', 'अतीत कोण... मीच' या लेखनातून त्यांनी मराठी कथनसृष्टीचा पैस विस्तारला आहे. अतिशय तरलपणे अनुभवद्रव्याला आकारीत करण्याचे कसब त्यांच्या जवळ आहे. तसेच चित्रित करीत असलेल्या जगाविषयी अपार आस्थाभाव त्यांच्या लिखाणातून प्रकटला आहे. मूळ कथाबीज कसे विस्तारायचे याचे निराळे आविष्कार तंत्र त्यांच्या जवळ आहे. अनेक कोनांतून, अनेकांच्या दृष्टिबिंदूतून कथन व्यवहाराकडे पाहण्याचे कौशल्यही त्यांच्या जवळ आहे. त्यामुळे त्यांचे कथन पात्रांच्या मनःस्थितीचा वेध घेतेच, त्याबरोबरच त्यास कारणीभूत असणाऱ्या परिस्थितीचा आवाजही ध्वनित करते.


संपूर्ण परीक्षण इथे वाचा..