शांता गोखले यांच्या One foot on the Ground A life Told Trough the Body' या इंग्रजी आत्मचरित्राचा अनुवाद 'एक पाय जमिनीवर' हा करुणा गोखले यांनी केला आहे. दोन्ही पाय जमिनीवर टेकलेले असलेच पाहिजेत म्हणून 'एक पाय जमिनीवर' हे शीर्षक!

शांता गोखले हे अनुवाद कार्यासाठी परिचित नाव! 'दुर्गा खोटे', 'स्मृतिचित्र', 'माझा प्रवास', 'धग', खानोलकर एलकुंचवार यांच्या नाटकांचा अनुवाद, इंग्रजी- मराठी रंगभूमीशी निगडित अभ्यासक आणि रसिक प्रेक्षक, अध्यापन क्षेत्र, पटकथाकार, कला समीक्षक, द्विभाषिक लेखिका, सदर लेखन आणि कादंबरीकार. वाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, साहित्य अकादमी पारितोषिक प्राप्त, अनेक संस्थांकडून सन्मानित, जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी आणि बरेच काही...

माझ्या शरीरानं मला जे काही दिलं होतं आणि जे दिलं नव्हतं त्या सगळ्यासाठी माझं माझ्या शरीरावर बेहद्द प्रेम होतं." असं त्या म्हणतात. शरीराकडे बघण्याचा रुपकात्मक दृष्टिकोन टाकून त्याकडे प्रगल्भपणे पाहावे, शरीराकडे आनुषंगिक बाब म्हणून न पाहता एक मध्यवर्ती घटित म्हणून बघावं ही कल्पना त्यांना आवडली. स्वतःचं शरीर असं लख्ख प्रकाशात तळहातावरच्या आवळ्यासारखं निरखून पाहावं, म्हणजे त्यात पारदर्शकता येईल असं त्यांना वाटलं आणि त्यामुळेच या आत्म-चरित्राला अनोखेपण प्राप्त झालं... 

पूर्ण लेख इथे वाचा..