इतिहास , दुर्ग

अथातो दुर्गजिज्ञासा

(Athato Durgajidnyasa)

लेखक : प्र. के. घाणेकर

प्रकाशन : स्नेहल प्रकाशन

महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. इथे आहेत तितके आणि तसे किल्ले किल्ले अन्यत्र नाहीत. पण या किल्ल्यांचे प्राचीनत्व, त्यांची वैशिष्ट्ये याबद्दलचे आपल्या मनात कुतुहल तसेच राहते. महाराष्ट्रात सातवाहन, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार, शिवराय, पेशवे, मोगल, हबशी, इंग्लिश, पोर्तुगीज, डच आदींनी किल्ले बांधले. त्यांची दुर्गवैशिष्ट्ये कोणती ? महाराष्ट्रात नेमके किती किल्ले आहेत ? शिवछत्रपतींनी दुर्गबांधणीत कोणते प्रयोग केले ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतील. महाराष्ट्राच्या गड-कोट-किल्ले अन् दुर्गांवर हिंडणाऱ्या तरुण पिढीच्या मनात येणाऱ्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आढळतील. प्रख्यात दुर्गप्रेमी प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या या आगळ्या पुस्तकाचे पूर्वीच्या पुस्तकांप्रमाणेच आपण स्वागत कराल असा विश्वास वाटतो.

(out of stock)

MRP ₹300 ₹240 (60₹ Discount)