कथासंग्रह

चौथी भिंत आणि इतर कथा

(Chauthi Bhint aani itar katha)

लेखक : उर्मिला पवार

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

उर्मिला पवार यांच्या या कथा १९८९ ते २००२ या कालखंडातील आहेत. जागतिकीकरण आणि जमातवादी राजकारणाच्या दृढिकरणाच्या काळात बुध्द-फुले-आंबेडकर या वारशावर उभारलेल्या स्त्रीवादी दृष्टीच्या मांडणीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.

उर्मिलाताईच्या कथांनी दलित-आंबेडकरी स्त्रीवादाच्या सहाय्याने स्त्रीचे आत्मभान आणि सखीभाव यांची पायाभरणी केली. स्त्रियांच्या मनात बुध्द-फुले-आंबेडकर यांच्या वारशातून घडलेले परिवर्तन आणि त्याचे व्यक्तिगत तसेच सामूहिक जीवनाशी असणारे नाते मांडताना त्यांनी त्यांच्या कथांमधून जी भेदक पण करुणामय दृष्टी वापरली ती या स्त्रीवादाचा गाभा आहे.

दलित आत्मकथनांमधून मांडल्या गेलेल्या सामाजिक वास्तवाचे विश्लेषण करण्याची जबाबदारी या कथा घेताना दिसतात. 'उपेक्षित, दुर्लक्षित अशा अस्पृश्य स्त्रीचे कर्तृत्व, प्रतिकूल परिस्थितीत तिने घडवलेला इतिहास तिला असलेली शिक्षणाची तळमळ अशा अनेक अंगांनी आंबेडकरी कार्यकर्ती' शोधण्याचा आणि मांडण्याचा...' उर्मिलाताईंचा ध्यास त्यांच्या कथालेखनातूनही समोर येतो. साहजिकच दलित पुरुषसत्ताकतेची देखील निर्भीड चिकित्सा या कथांमध्ये आहे. त्यासाठी उदारमतवादातून येणारी व्यक्तिनिष्ठा कधी महत्त्वाची ठरते तर अनेकदा सम्यक सामाजिक भान मोलाचे असते. स्त्रीआणि पुरुष दोघेही सम्यक दृष्टिचा स्वीकार करतील तेव्हाच स्त्रीवाद आकार घेईल ही जाणीव या कथांमध्ये आहे.

उर्मिला पवारांच्या अनवट वाटेवरुन चालताना प्रज्ञा दया पवारांच्या लेखनात मुरत गेलेले है दृष्टिसातत्य भारतीय स्त्रीवादाची ही परंपरा समृध्द करतात- रहे तूच दिलेलं द्रष्टेपण भीमा की, आम्ही चिरायू ठेवलं करुणेचं सार्वभौमत्व !


वंदना भागवत


(out of stock)

MRP ₹390 ₹350 (40₹ Discount)