कथासंग्रह

दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी

(Don Shatakanchya Sandhyavarachya Nondi)

लेखक : बालाजी सुतार

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

लघुकथेच्या बंदिस्त परिघातून मराठी कथेला स्वतःचा मोकळा अवकाश प्राप्त करून देणाऱ्या आजच्या कथाकारांत बालाजी सुतार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. 'दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी' हा त्यांचा कथासंग्रह आजच्या मराठी कथेला स्वतःचा नवा स्वर प्राप्त करून देणारा आहे. मौखिक परंपरेला जोडून घेऊन नव्या कथनशक्यता शोधत, अनोख्या कथाबंधाची घडण जाणीवपूर्वक करत बालाजी सुतार यांची कथा वाचकासमोर येते. ती नव्या भाषेची, मूल्ययुक्त तपशिलाची जाणीवपूर्वक पेरणी जशी करते; तशीच ती आजच्या काळातले 'सांगणे' शोधून वाचकाला त्या सांगण्याच्या भोवऱ्यात अडकवून गरगरून टाकते. 'दोन जगातला कवी', 'विच्छिन्न भोवतालाचे संदर्भ', 'पराभवाच्या बखरीतली काही पानं', 'दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी' ह्या आजच्या मराठी कथासाहित्यातील श्रेष्ठ कथा आहेत. मराठी कथासाहित्याचा किरटा झालेला स्वर ही कथा मोकळा करून स्वतःची गडद छाया निर्माण करण्याची सशक्त कामगिरी करते. बालाजी सुतार हे नाव वगळून उद्याच्या कथासाहित्याचा इतिहास लिहिता येणार नाही याची खात्री या संग्रहातील कथा देतात. हेच या कथासंग्रहाचे थोरलेपण आहे.

- राजन गवस


(out of stock)

MRP ₹250 ₹225 (10% Discount)