दुर्ग

दुर्गपुंज जिंजी आणि वेलोरचा बलाढ्य भुईकोट

(Durgapunja Jinji Ani Vellorecha Baladhya Bhuikot)

लेखक : प्र. के. घाणेकर

प्रकाशन : स्नेहल प्रकाशन

महाराष्ट्राबाहेरचे पण शिवकालात अत्यंत महत्वाचे ठरलेले जिंजी व वेलोर हे किल्ले. जिंजी किल्ला हा एक दुर्गपुंज आहे. राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायणदुर्ग असे तीन बालेकिल्ले व त्यांना कवेत घेणारी खालच्या खंदकपरिवेष्टित भुईकोटाची तटबंदी, अशी याची अद्वितीय रचना आहे. हा किल्ला संपूर्ण देशातील एक अभेद्य असा महत्वाचा किल्ला आहे. श्रीशिवछत्रपतींनी आपल्या दक्षिण दिग्विजयात रक्ताचा थेंबही न सांडता, हा किल्ला मिळवला, त्याचा पुढे राजाराम महाराजांना खूप उपयोग झाला.

वेलोर हा एक बलाढ्य बेलाग बळकट असा देखणा भुईकोट. त्या भोवतालचा खंदक, त्याची चर्यायुक्त दुहेरी भक्कम तटबंदी, किल्ल्यातील संग्रहालये, श्रीजलकंठेश्वर मंदिर व त्याचा अतीदेखणा शिल्पखचित स्तंभांचा कल्याणमंडप हे सारं निगुतीनं पाहायलाच हवं. या किल्ल्याचा, खंदकाच्या पाणीपातळीखाली राहणारा गुप्त पलायनमार्ग हे सारं नीट समजावून घ्यायला हवं.

या किल्ल्यांवर कसं जावं? काय पाहावं? त्या ठिकाणांची ऐतिहासिक माहिती, यांचं उत्कृष्ट विवेचन या पुस्तकाद्वारे दुर्गअभ्यासक श्री.प्र.के. घाणेकर यांनी केलं आहे. ते वाचून आपण इथे जायलाच हवं, असं नक्की वाटेल.

(out of stock)

MRP ₹160 ₹130 (30₹ Discount)