एका दिवसातील बारा तासात सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीस लक्ष वृक्ष लागवडीचा मला अनुभव आहे. देशातील चाळीस हजारांच्या वर कॉलेज आणि नऊशे एकतीसच्या वर विद्यापीठांनी हा 'एक मूल तीस झाडे उपक्रम हाती घ्यायला हवा. हे राष्ट्रीय कार्य व्हायला हवे. आपले एन.एस.एस. व एन.सी.सी. विभाग कार्यतत्पर आहेत. मला विश्वास आहे; इतर कार्याप्रमाणेच हे ही कार्य सर्वजण उत्तम रीतीने पार पाडतील. राष्ट्र उभारणीसाठी ही वचनबद्धता महत्त्वाची आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केल्याप्रमाणे ला-निना, अल-निनो, तापमान वाढ ही वातावरण बदलाची उदाहरणे आहेत. त्यामुळे 'एक मूल तीस झाडे' हे अभियान सर्वांनी राबवावे.
- डॉ. एन. रामचंद्रन कुलगुरू, जागतिक पर्यावरणतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ