(Ekvinshati)
लेखक : रवींद्रनाथ ठाकुर
प्रकाशन : साहित्य अकादमी
जगभरात होऊन गेलेल्या महान साहित्यिकांपैकी रवींद्रनाथ ठाकुर हे एक होत. महाकाव्य हा वाङ्मयप्रकार वगळता इतर सर्व वाङ्मयप्रकारांत त्यांनी अद्वितिय प्रतिभेने लेखन केले. लघुकथा या वाङ्मयप्रकारावर तर त्यांची अमीट मुद्रा आहे, हे मामा वरेरकर यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या एकवीस लघुकथांवरुन स्पष्ट होते. ज्या कलेची त्यांनी आजीवन सेवा केली, ती त्यांच्या प्रचंड निर्मितीमुळे निःसत्व वा रुक्ष होण्याऐवजी उलट विलक्षण सुंदर अशा नवनव्या कृती निर्माण करीत राहिली. त्यांच्या कथांमध्ये त्यांची वास्तवदर्शी कल्पनाशक्ती, सत्यान्वेषणाची अंतर्ज्ञानासारखी शक्ती, आवश्यक तेवढेच स्वीकारण्याचे कौशल्य, अतिरिक्तता आणि भावविवशता यांचा त्यांना असलेला तिटकारा, त्यांची असीम मानवता, अन्यायाचे त्यांना असलेले वावडे, आणि त्यांचे अप्रतिम रचनाकौशल्य ही त्यांच्या बहुमुखी प्रतिभेची गुणवैशिष्ट्ये अत्यंत सशक्तपणे व्यक्त होतात.
(out of stock)
MRP ₹200 ₹160 (40₹ Discount)