समीक्षा

जीए : समजले तेवढे, समजले तसे..

(G.A. Samajale Tevadhe, Samajale Tase)

लेखक : डॉ. संजीव कुलकर्णी

प्रकाशन : पपायरस प्रकाशन

पुस्तके, जुने इंग्रजी सिनेमे, चमचमीत मसालेदार जेवण, सिगारेट, चित्रकला, बागकाम यांची आवड असणारा, बरेच पूर्वग्रह बाळगणारा, स्वतःला अभिमानाने 'जुनाट' म्हणतून घेणारा, माणसांत मिसळायची नावड असणारा आणि आपल्या काळ्या चष्म्यामागून जगाकडे अत्यंत कुतुहलाने बघणारा एक जगावेगळा माणूस माणूस हा काळाच्या विशाल पठावरील एक नगण्य प्यादे आहे आणि मानवी आकांक्षा, अभिमान आणि अस्मिता यांचे नियतीच्या विक्राळ लाटेसमोरचे स्थान अगदी क्षुद्र आहे या एकाच तत्वज्ञानावर आधारलेले पण एकसुरी नसलेले लेखन करणारा एक आगळावेगळा लेखक.

आपले लेखन म्हणजे आपल्या आयुष्यात आपण पाहिलेल्या लोकांच्या दुःखांना वाहिलेले 'तर्पण' आहे अशी भावना बाळगणारा एक संवेदनशील पण बुजरा माणूस.

आपल्या आसपासचे आयुष्य एखाद्या टीपकागदाप्रमाणे शोषून घेणारा आणि ते कधी नागर तरी कधी ग्राम्य, कधी संस्कृतप्रचुर तर कधी गावठी भाषेत मांडणारा अचाट शब्दप्रभू.

काही अरभाट, काही चिल्लर माणसे बघून, न्याहाळून, हळूच त्यांना उचलून पुस्तकाच्या पानांवर आणून बसवणारा जादूगार.

जीए वाचकाला अशा अनेक रूपांत भेटतात. भिजलेल्या अळीवाच्या दाण्यांप्रमाणे, चिमटीत न येणारी, निसटून जाणारी त्यांची ही रुपे. त्यांच्या पात्रांचे वागणे-बोलणे, खाणे-पिणे, त्यांचा धर्म आणि त्यांची नीती, त्यांची भाषा आणि त्यांची देहबोली.. या सगळ्यांतून दिसलेले जीए.

समजलेले, न समजलेले जीए.

(out of stock)

MRP ₹399 ₹320 (79₹ Discount)