इतिहास

गड-मंदिरांवरील द्वारशिल्प

(Gad - Mandiranvaril Dwarshilpa)

लेखक : महेश तेंडुलकर

प्रकाशन : स्नेहल प्रकाशन

महाराष्ट्र हा गड दुर्गाचा देश आहे. या दुर्गाच्या देशात दुर्गप्रेमींची संख्या देखील बरीच मोठी आहे. त्यांच्या अनेकवेळा अनेक दुर्गावर अक्षरशः वाऱ्या सुरू असतात. पण दरवेळी त्यांचा दुर्गात प्रवेश होतो तो भरभक्कम दरवाजांतून नाही तर तट बुरुजांच्या भग्नावशेषांमधून. दुर्गाचे जुने दरवाजे डागडुजीअभावी केव्हाच ढासळून गेले आहेत आणि जे आज कसेबसे तग धरून उभे आहेत, त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. दुर्गाच्या या रक्षकाकडे जरा एकदा बघा, एखादा अनोखा कलाविष्कार तुमच्या मनात नक्कीच भरेल. मग तो शिलालेख असो, देवदेवतांच्या प्रतिमा असोत, नाही तर डाव्या-उजव्या बाजूची द्वारशिल्पं असोत. दुर्गाच्या दरवाजांवरील कलाकृती दुर्गप्रेमींना हमखास बुचकळ्यात टाकतात. अशा चोखंदळ दुर्गप्रेमी मंडळींसाठी हे पुस्तक आहे.

यात गड, मंदिर व समाधी या महत्त्वाच्या वास्तूंवर आढळणारे शरभ, गंडभेरुंड, व्याल वगैरे प्रतिमांच्या मागील संकल्पना काय ? त्यांचे प्रकार कोणते ? महाराष्ट्रा-बाहेर कर्नाटक व गोवा या राज्यांमध्ये हमखास आढळणारे गंडभेरुंड जेव्हा युरोपमध्ये दिसतात तेव्हा दोन्हीमधील साम्य व भेद कोणते? या सर्व गोष्टींचा अगदी बारकाईने आढावा घेऊन स्नेहल प्रकाशन प्रथमच घेऊन येत आहे 'गड-मंदिरांवरील द्वारशिल्पं'.

(out of stock)

MRP ₹100 ₹80 (20₹ Discount)