(Gharapuri Darshan)
लेखक : डॉ. गो. बं. देगलूरकर
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन
बाहेरून सामान्य दिसणाऱ्या या लेणीत प्रवेश करताच अद्भूत गुहेत गेल्यासारखे वाटते. पाहणारा चकीत होतो आणि भांबावूनही जातो. या लेणीवरून लक्षात येते ती कलाकारांच्या आणि शिल्पकारांच्या प्रतिभेची झेप. त्यांच्या हातात असीम कौशल्य, मनांत नवनवोन्मेषशाली प्रतिभा आणि हृदयात होती अपार भक्ती. मोठ्या श्रद्धेने, अलौकिक निष्ठेने त्यांनी विस्मयचकित करणारे हे शिवालय निर्माण केले.
या लेणीकडे बोटीनेच जावे लागते जणू काही संसार सागरातून तरून जाऊन नवविधाभक्तीचे डोंगर चढून गेल्यावरच देवासन्निध जाता येते याचा पाठच येथे मिळतो. शिल्पकारांनी येथे मूर्तीच्या बाह्य सौंदर्यावरच भर दिलेला नसून त्यांचे अंतरंगही उकलून दाखविले आहे. त्यामुळे पाहणाऱ्याच्या डोळ्यांना वाटते की त्यांच्यासाठीच हे कोरले आहे, मनाला वाटते हे बोधगर्भ आहे म्हणजे त्यांच्या करिताच असणार, अध्यात्मिकवृत्तीच्यांना वाटणार हे त्यांच्यासारख्यांनाच योग्य आहे आणि भक्तांना वाटणार येथे त्यांचेच अधिराज्य आहे.
(out of stock)
MRP ₹125 ₹100 (25₹ Discount)