(Ghashiram Kotwal)
लेखक : विजय तेंडुलकर
प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन
‘घाशीराम कोतवाल’ हे विजय तेंडुलकरांचे अगदी वेगळ्या आकृतिबंधाचे नाटक. पेशवेकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या या नाटकातून तेंडुलकरांनी वर्तमानकालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सत्ताधारी नाना फडणवीस घाशीराम कोतवालाला आपल्या मर्जीनुसार खेळवतो, त्याच वेळी समाजालाही खेळवतो. संपन्नतेच्या टोकाला पोहोचलेला समाज क्रमशः कसा ऱ्हासाकडे झेपावत जातो आणि या ऱ्हासास सत्ताधारी आपल्या स्वार्थी अभिलाषेपोटी कसा हातभार लावतात त्याचे समग्र दर्शन या नाटकात घडते. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या क्षेत्रात या घाशीरामाचे दर्शन आपल्याला प्रत्यही घडत असते, त्या दृष्टीने हे नाटक कालातीत आहे असे म्हणता येईल.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार मकबूल फिदा हुसेन या नाटकाने अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी नाटकाशी संबंधित काही रेखाचित्रे काढली. ही वैशिष्ट्यपूर्ण चित्रे या पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
(out of stock)
MRP ₹150 ₹125 (25₹ Discount)