कथासंग्रह

गॉगल लावलेला घोडा

(Gogle Lavlela Ghoda)

लेखक : निखिलेश चित्रे

प्रकाशन : पपायरस प्रकाशन

‘गॉगल लावलेला घोडा’ मधल्या सर्वच कथा जीवनातल्या अपूर्णत्वाला पूर्णत्व देण्याच्या तीव्र प्रेरणेतून लिहिल्या गेल्या आहेत. प्रत्येक लेखकाच्या मनात त्याचं असं एक विश्व असतं. निखिलेश चित्रे यांच्या या कथांमधून त्यांचं विश्व साकारलं आहे. अपुऱ्या, एकारलेल्या, एकसाची सपाट बनलेल्या जीवनाबद्दलचं असमाधान दाखवण्यासाठी चित्रेंनी या कथांचा आरसा त्या वास्तव जीवनासमोर धरला आहे. पण मराठी वाचकांच्या मनवळणी पडलेला, वास्तवाचं ‘हुबेहूब’ दर्शन घडवणारा हा आरसा नाही. चित्रविचित्र आकारांच्या भुलभुलैय्यात वाचकाला हरवून टाकणारा, त्याला स्व‍त्वाचा शोध घ्यायला भाग पाडणारा, हा चमत्कारिक भासणारा आरसेमहाल आहे.

हे निखिलेश चित्रे यांनी उभारलेलं एक समांतर विश्व आहे. या विश्वाच्या आणि त्यात वावरणाऱ्या माणसांच्या वर्तणुकीमागे एक स्वतःचा तर्क, कार्यकारणभाव आहे. एकदा का त्याची नस पकडली की वाचकाला या कथांपासून मिळणारा आनंद आणि आयुष्याबद्दलची खोलवरची उमज ही मराठी कथासाहित्यात अन्यत्र अनुभवायला मिळणं अशक्य आहे. ‘गॉगल लावलेल्या घोड्या’प्रमाणेच जगाच्या नकाशात कुठेही नसणारा ‘सिनारा’ देश, कथेतल्या पात्रानं लेखकाविरुद्ध पुकारलेलं बंड, पुस्तकं खाणारा सुरवंट, कथाकाराला अनाकलनीय रहस्याच्या विवरात खेचून घेणारा गूढ पाषाण, प्रतिभेची मुंगी चावल्यानं लेखकाला मिळणारं यश – अशा सगळ्या गोष्टी खास निखिलेश चित्रे यांच्या कथांमध्येच घडू शकतात.

- नीतीन रिंढे

(out of stock)

MRP ₹399 ₹340 (59₹ Discount)