बालसाहित्य

हाक शांततेसाठी : कुमारांसाठी युद्धविरोधी चिंतनकथा

(Hak Shantatesathi)

लेखक : पृथ्वीराज तौर

प्रकाशन : हस्ताक्षर प्रकाशन गृह

ही हाक फक्त शांततेसाठी नाही, माणसाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी दिलेली ती हाक आहे. बोथट झालेल्या मानवी मनाला संवेदनशीलतेने घातलेली हाक आहे. क्रूर, महत्त्वाकांक्षी नेत्यांनी आणि राष्ट्रांनी जगावर लादलेल्या आणि आजही सुरू असलेल्या हिंसाचाराकडे बघूनसुद्धा न बघितल्यासारखे करणान्या सर्वसामान्य जनतेला सुबुद्ध करण्यासाठीची हाक आहे.पृथ्वीराज तौर यांनी युद्धाचा आक्रोश अत्यंत संयमाने आणि सार्थ शब्दांमध्ये व्यक्त केला आहे. हे पुस्तक शांततेवर विश्वास ठेवणाराला सक्रिय करू पाहतेच; पण युद्धपिपासू वृत्तीलाही आवाहन करते. यातल्या अनेक ओळी सुभाषितासारख्या आहेत. उदा. युद्ध डोळ्यांना आणि दृष्टीला दोघांनाही संपवून टाकतं....माणसाच्या भविष्याची काळजी करणाऱ्या प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे.

- ज्ञानेश्वर मुळे (आय.एफ.एस.) माजी राजदूत व सचिव, भारत सरकार

(out of stock)

MRP ₹160 ₹135 (25₹ Discount)