कथासंग्रह

इत्तर गोष्टी...

(Ittar Goshti...)

लेखक : प्रसाद कुमठेकर

प्रकाशन : पपायरस प्रकाशन

या संग्रहातली प्रसाद कुमठेकर यांची लघुकथा पात्र, प्रसंग, घटनांच्या शोभिवंत आत्मछटाईतून आकाराला आलेली नाही. मानवी जीवनाची अपूर्णता आणि अर्थपूर्णता यांच्याशी कथेचा असलेला संबंध शोधत नैसर्गिकपणे ती या रुपात प्रकट झाली आहे. ब्रम्हांडातून पिंडात प्रविष्ट झाल्यासारखी. त्यामुळे अटकर अवकाशातही ही कथा विश्वाची निर्मिती, मानवी उत्क्रांती यांच्यापासून जन्म, मृत्यू, भूक, मैथुन अशा अनेक बाबींना सक्षमपणे हाताळते. समकाळाला बोलते करण्याची विलक्षण हातोटी या कथेच्या उदगिरीभाषक निवेदकाला लाभलेली आहे. हा निवेदक कसलेल्या फलंदाजाने स्वयंचीत व्हावे तसा हेतूपूर्वक आत्मवंचित होतो आणि काळाचे, समाजाचे, नात्यांचे सातत्याने परीक्षण करतो. यातून तेजतर्रार विनोदाची सहनिर्मिती होते आणि कथेचा विधी रसाळ बनतो.

कुमठेकरांच्या लेखणीने दूरचित्रवाणी, समाजमाध्यम, वर्तमानपत्र अशा विविध माध्यमांतून आपले वळण गिरवलेले आहे. त्याद्वारे सद्यकाळाचे 'शब्दसंख्याशास्त्र' स्वतःत मुरवून घेतलेले आहे. एकविसाव्या शतकाचा पाव भाग संपताना, मराठी कथेच्या भावी वाटचालीची एक दिशा त्यातून सूचित होते. या कथासंग्रहातील 'क्ष'ची गोष्ट, हॅमरशिया, इन्सल्टेड सेल्स इत्यादि सर्वच कथा त्या दिशेने सुसाट सुटलेल्या आहेत. कुमठेकरांच्या पुढच्या संग्रहातील इतर गोष्टींची वाचकांनी ताटकळत वाट पहावी इतकी या कथासंग्रहातील 'इत्तर गोष्टीं'ची मातब्बरी आहे.

- किरण गुरव

(out of stock)

MRP ₹340 ₹290 (50₹ Discount)