(Koraku Lokgite)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मध्ये असणाऱ्या आदिवासी जमातींपैकी कोरकू ही एक प्रमुख जमात आहे. वांशिकदृष्ट्या कोरकू हे झारखंडमधील मुंडा या आदिवासी परिवाराशी संबंधित आहे. कोरकूंच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची संपूर्ण जीवनव्यवस्था लोक गीतांनी व्यापलेली आहे. त्यांच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनाची अभिव्यक्तीसुद्धा लोकगीतांच्याच माध्यमातून झालेली असते. लोकगीत हे कोरकूंच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ व्यक्त करणारे एक प्रभावी माध्यम आहे. कोरकूंची लोकगीते ही मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आलेली आहे. कोरकूंच्या लोकगीतांमध्ये नृत्यगीतांचा भरणा अधिक आहे. नृत्य ही आदिवासींच्या जीवनाची आधारशिला आहे. गीत, संगीत आणि नृत्य या तिन्ही कलाप्रकारांचे धागे एकमेकांत नाजुकपणे गुंफलेले असतात. कोरकूंच्या कला संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आहे.
(out of stock)
MRP ₹225 ₹180 (45₹ Discount)