(Marathi Kadambari : Pais Ani Parigh)
लेखक : नितीन रिंढे
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
एकोणिसाव्या शतकात उदयाला आलेली, विसाव्या शतकात विस्तार पावलेली आणि एकविसाव्या शतकात नव्या वाटा शोधू लागलेली मराठी कादंबरी, हा या पुस्तकाचा विषय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वास्तववादी साहित्यदृष्टी आणि प्रबोधनवादी सामाजिक विचार यांनी मराठी कादंबरीला घडवले, तर स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिकवाद, देशीवाद, उत्तराधुनिकवाद या विचारांनी कादंबरीला आकार दिला. मराठी कादंबरीच्या अशा स्थित्यंतरांमधल्या, कथनक्रियेपासून विचारप्रणालीपर्यंत विविध आयामांचा या पुस्तकाच्या पहिल्या भागात विचार केला आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या विभागातले निबंध एकोणीसशे साठनंतरचे काही कादंबरीकार वा कादंबऱ्या यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहेत. या कादंबरीसाहित्याच्या रूपाशयाचे मूल्यमापन केले आहे; जीवनदृष्टीचा शोध घेतला आहे. त्याचबरोबर या कादंबरीच्या विविध प्रवृत्ती, त्यामागील लेखकांच्या कादंबरीविषयीच्या धारणा आणि त्यांचा एकंदर मराठी कादंबरीवर झालेला परिणाम - अशा मुद्द्यांचीही चर्चा केली आहे. एकूणात, मराठी कादंबरीच्या 'पैसा'चा ठाव घेतानाच तिच्या 'परीघ-मर्याद'ची ही समीक्षा आहे. केवळ अभ्यासकांनाच नव्हे, तर कादंबरीच्या रसिक वाचकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे
(out of stock)
MRP ₹390 ₹350 (40₹ Discount)