(Marathi Kadambari Tresashta Te Tera)
लेखक : हरिश्चंद्र थोरात
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
ऐतिहासिक दृष्टिकोणातून कादंबरीचे विवेचन करताना कालानुक्रमाला अनेकदा खूप महत्त्व दिले जाते. लेखनाच्या कालानुक्रमाने कादंबऱ्यांचे वर्णन केले की कादंबरीचा इतिहास सिद्ध होतो, असा गैरसमजही पसरलेला आहे. या दृष्टिकोणातून केवळ कादंबरीचाच नव्हे, तर कोठलाही इतिहास काळाच्या प्रवाहात एका दिशेने पुढे जाणाऱ्या कथनासारखा उलगडत असतो असे गृहीत धरावे लागते. या एकरेषीयतेच्या मदतीला अनेकदा विकासाची संकल्पनाही घेतली जाते आणि इतिहासाचे व्यामिश्र स्वरूप या ठरीव रूपबंधामध्ये कोंबून बसवले जाते. कालानुक्रमाशी इमान राखत क्षितिजसमांतर रेषेत पुढे जाणाऱ्या इतिहासाला आडव्याबरोबर उभे फाटे फोडल्याशिवाय व त्याची एकरेषीयता मोडल्याशिवाय केवळ कालानुक्रमावर असलेला भर ओसरणार नाही.
- मराठी कादंबरी : त्रेसष्ठ ते तेरामधून
(out of stock)
MRP ₹150 ₹135 (10% Discount)