(Marathitil Marxvadi Sahityasamiksha)
लेखक : हरिश्चंद्र थोरात
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
साहित्यव्यवहारातील व्यामिश्रता, त्याचा एकूण समाजरचनेशी असलेला संबंध, संस्कृतीचे राजकारण या सर्व गोष्टींच्या विश्लेषणावर व आकलनावर मार्क्सवादी समीक्षा उभी राहते. हे आकलन एकांगी आणि यांत्रिक होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते, तसेच हे आकलन मार्क्सवादी असावे याचीही काळजी घ्यावी लागते. या दोहोंमधील तोल साधला जाणे आवश्यक असते. तसे झाले नाही तर एका बाजूने पाहता मार्क्सवादी गृहीतके आदेशात्मक व 'दिलेली' गृहीतके वाटू लागतात. चिकित्सेची प्रक्रिया थांबते दृष्टीला नवी परिमाणे प्राप्त होत नाहीत. दुसऱ्या बाजूने पाहता, आपण मार्क्सवादी भूमिका घेतो आहोत म्हणजे काही तरी गुन्हा करतो आहोत, असे वाटू लागते. असे झाले की मार्क्सवादाच्या ऐतिहासिक, राजकीय, सौंदर्यशास्त्रीय भानावरची पकड नाहीशी होऊ लागते. परिणामतः आपण मार्क्सवादी समीक्षेचा संकुचित प्रांत ओलांडून पुढे आलो आहोत असा भास होऊ लागतो. समकालीन, उदार, स्वतंत्र आणि मुक्त झालो आहोत असे वाटू लागते. मराठीतील मार्क्सवादी समीक्षेच्या बाबतीत या दोन्ही प्रक्रिया घडल्या आहेत.
- मराठीतील मार्क्सवादी साहित्यसमीक्षामधून
(out of stock)
MRP ₹750 ₹635 (115₹ Discount)