समीक्षा

मूल्यभानाची सामग्री

(Mulyabhanachi Samagree)

लेखक : हरिश्चंद्र थोरात

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

म्हणूनच संस्कृतीमध्ये लिंगभाव येतो. श्रेणिभावाच्या, वंशश्रेष्ठत्वाच्या, मानाच्या, डौलाच्या, अस्मितेच्या संकल्पना येतात. फॅशन येते. सौंदर्याविषयीच्या संकल्पना येतात. स्तुतिसुमने वाहण्याच्या पद्धती येतात. शिव्याही येतात. शिक्षणाच्या पद्धती येतात. इतिहासाची अर्थनिर्णयने येतात. नीती अनितीच्या कल्पना येतात. विश्वास येतात. रुढी येतात. उत्सव येतात आणि दैनंदिन जगण्यातल्या नमस्कार करण्यापासून कचरा करण्यापर्यतच्या अनेक गोष्टीही येतात.

संस्कृतीमुळे आपल्या जगण्यातील अर्थपूर्णता निर्माण होते आणि संस्कृतीमुळे माणसांना अंध करणारी नियंत्रणेही घातली जातात. संस्कृती घडवली जाते. रचली जाते. तिच्या जडणघडणीमागे सत्तेचे, उत्पादनाचे, शोषणाचे, अन्यायाचे संबंध असतात. व्यवहारांच्या पृष्ठस्तरावर ते येऊ नयेत याची काळजी संस्कृतीकडून घेतली जात असते. दडपणे आणि दडवणे ही संस्कृतीचे पद्धतिशास्त्र असते. रंगसफेदी करण्यासाठी संस्कृतीचा बेमालूमपणे उपयोग होत असतो. ती लोकभावनांचे अनुकूलन करून घेते आणि सत्तेचे हितसंबंध जपते. संस्कृती म्हणजे अखेरीस सागाड्यावर चढवलेला डोळे दिपवणारा मुलामा असतो. संस्कृती क्लोरोफॉर्मसारखे काम करते. ती बेहोषी आणते. झिंग आणते. ती शोषणाचे साधन ठरते. उत्पादन आणि सामाजिक संबंधांचे राजकारण या दोन्ही गोष्टी संस्कृतीमध्य एकात्म होत असतात. पण त्यांचे अस्तित्व प्रथमदर्शनी जाणवत नाही. म्हणूनच तिची सतत चिकित्सा करत राहावी लागते.

मूल्यभानाची सामग्री मधून


(out of stock)

MRP ₹450 ₹405 (10% Discount)