समीक्षा

नामदेव ढसाळ यांची कविता जगण्यातील समग्रतेचा शोध

(Namdev Dhasal Yanchi Kavita : Jaganyatil Samagratecha Shodh)

लेखक : वसंत पाटणकर

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

ढसाळांचा काव्यप्रवाह सतत वेगवेगळी वळणे घेत वाहताना दिसतो. त्याचे अंतप्रवाहही वेगवेगळ्या गतीने, शक्तीने वाहताना दिसतात. क्वचित कोठे तो संथ असेल, तर कोठे तो धारदार, अत्यंत वेगवान असेल, कोठे साधासरळ असेल, तर कोठे न दिसणारे परंतु खोलवर गरगरा फिरवणारे भोवरे असतील; त्याविषयी काही सांगता येणे शक्य होत नाही. त्यामुळे आशयसूत्रे, काव्यभाषा, काव्यरूप यांबाबत येथे कोणतेही साचे तयार होत नाहीत. या सर्व गोष्टी सतत वेगळ्या, नव्या, ताज्या वाटतात.

MRP ₹125 ₹110 (15₹ Discount)