(Piwla Piwla Pachola (Paperback))
लेखक : अनिल साबळे
प्रकाशन : पपायरस प्रकाशन
अनिल साबळे यांच्या कथा विशिष्ट भौगोलिक परिसर आणि तिथल्या विविध अवकाशांशी घट्ट जोडलेल्या आहेत. हा परिसर मराठी साहित्याला फारसा परिचित नाही. या कथांमधली पात्रं आणि त्यांचे परस्परसंबंध या परिसराशी आत्मीयतेने एकजीव झालेले आहेत. तिथल्या विविध अवकाशांच्या सूक्ष्म तपशिलांच्या ताण्याबाण्यातून साबळे यांच्या कथेची वीण घडत जाते. पात्रं आणि परिसराचं असं निगडित असणं या कथांना एकसंधता देतं. कथांमधले निसर्गाचे तपशील ताजे आणि रसरसशीत तर आहेतच, पण ते फक्त नाविन्यापुरते नाहीत, तर कथांच्या आशयाशी लिप्त आहेत.
अनिल साबळे यांची कथा वाचकाला एका अपरिचित अनागर विश्वात घेऊन जाते. हे विश्व स्वतःचं स्वयंपूर्णत्व नेटाने टिकवून महानगरी ग्राहकवादापासून लांब राहिलेलं आहे. मात्र, हे अंतर कमी होत जाण्याचे संकेतही या कथांमधून उमटलेले दिसतात. साबळे यांच्या कथांमधून झालेलं या विश्वांचं दस्तऐवजीकरण म्हणूनच फार महत्वाचं आहे.
- निखिलेश चित्रे
(out of stock)
MRP ₹300 ₹255 (45₹ Discount)