कथासंग्रह

सात गोष्टींचं पुस्तक

(Saat Goshtinch Pustak)

लेखक : प्रशान्त बागड

प्रकाशन : पपायरस प्रकाशन

या पुस्तकात—किंवा कागदपत्रांच्या मंजुषेत—लहान-मोठ्या सात गोष्टी आहेत. गोष्ट म्हणजे कथा, वार्ता, चीजवस्तू, घटना, मामला, निरीक्षणांचं निबंधन. या गोष्टी, गोष्टींच्या गोष्टी किंवा गोष्टीतल्या गोष्टी बहुधा बाहेरून येतात, इथे आकाराला येतात आणि दुसरीकडे वा भलत्या प्रांती घेऊन जातात. पण त्या वस्तू आहेत, त्या असतात, त्या असण्यात वसतात.


प्रशान्त बागड यांची पहिली कथा अनुष्टुभ मधे प्रकाशित झाली. ‘विवादे विषादे प्रमादे प्रवासे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यांच्या काही कथांची आसामी, हिंदी व इंग्रजी भाषांतरं झाली आहेत. नवल ही कादंबरी ‘पपायरस’तर्फे प्रसिद्ध झाली. ते आय.आय.टी. कानपूर येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून कलामीमांसा हा त्यांचा मुख्य अभ्यासविषय आहे. सात गोष्टींचं पुस्तक हा बागड यांचा दुसरा कथासंग्रह.

(out of stock)

MRP ₹225 ₹190 (35₹ Discount)