इतिहास , दुर्ग

शिवकालीन दुर्ग व दुर्गव्यवस्था

(Shivkalin Durga Va Durgavyavastha)

लेखक : महेश तेंडुलकर

प्रकाशन : स्नेहल प्रकाशन

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग जाणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. राखलं आणि वाढवलं ते याच दुर्गाश्रयी राहून. त्यामुळे शिवकाळात तटबंदीयुक्त लष्करी ठाण्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. किंबहुना स्वराज्याचे अस्तित्वच या गडकोट व दुर्गांवर अवलंबून होते. शिवचरित्र वाचताना स्वराज्य रक्षक दुर्गाची रचना कशी होती? त्यांच्या रचनेत कोणकोणती वैशिष्ट्ये होती? कोणत्या वास्तू तिथे होत्या? स्वराज्यातील एखाद्या दुर्गावर कोणकोणते अधिकारी तैनात केले जायचे? त्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असायचा? त्यांची कार्यपद्धती कशी होती ? शिवकाळात दुर्गाचे मुलकी व लष्करी विभाग कशाप्रकारे कार्यरत होते ? शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील दुर्गांची नावे का बदलली ? शत्रूचा एखादा किल्ला जिंकून घेताना शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी कोणती दुर्गनीती वापरली? अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी स्नेहल प्रकाशन प्रथमच घेऊन येत आहे, शिवकालातील दुर्ग व दुर्गव्यवस्था

(out of stock)

MRP ₹250 ₹200 (50₹ Discount)