(Shivkalin Durgapatre)
लेखक : महेश तेंडुलकर
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन
'एखादा लेखक किंवा वक्ता, लिहितो किंवा बालतो त्याच्या शब्दांना किंमत किती? तर तो ज्या पुराव्यांचा वापर करतो त्या पुराव्यांना आहे तितकीच!' डॉक्टर सुरेन्द्रनाथ सेन यांचे हे वाक्य समकालीन, अस्सल व विश्वसनीय साधनांचे इतिहासलेखनातील महत्त्व दर्शवणारे आहे. कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट, नाणी वगैरे इतिहासाची साधने असली तरी विश्वसनीयतेच्या बाबतीत अस्सलपत्रांचे स्थान सर्वात वरचे आहे. कारण ती त्या काळातील वर्तमान दर्शवणारी असतात. अस्सलपत्रांच्या आधारे आपण इतिहासाच्या खूप जवळ जावून पोहोचू शकतो. त्यामुळे इतिहासलेखनात अस्सलपत्रांना फार महत्त्व आहे.
किल्ल्याचा इतिहास सांगताना अस्सलसाधनांचा आधार घेणे जास्त योग्य ठरते. कोणताही इतिहास हा तर्काने नाही, तर पुराव्यांच्या आधारे सांगावा लागतो. शिवाजीमहाराजांनी किल्ल्यांसंबंधी लिहिलेली पत्रे संख्येने फारच थोडी आहेत. पण ती जी उपलब्ध आहेत, त्यातील मजकूर समजून घेण्यात अनेक अडचणी आहेत हे लक्षात आले. त्या अडचणी दूर करण्याकरिता स्नेहल प्रकाशनने उचललेले हे पहिले पाऊल आहे. यात बहुतांशी पत्रे मोडी लिपीतील असून वाचकांच्या सोईसाठी मूळपत्रेच इथे दिलेली आहेत. तसेच त्यांची मराठी लिप्यंतरे ज्या संदर्भग्रंथांमध्ये प्रकाशित झाली आहेत त्यांचे संदर्भ, अवघड शब्दांचे सुलभ मराठी अर्थ, पत्राचे सर्वसाधारण स्वरूप आणि पत्राचा सुलभ मराठी अर्थ देऊन शेवटी या पत्रांवरून काही निष्कर्ष काढलेले आहेत, ते शाळकरी मुलांपासून इतिहाससंशोधकांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरतील यात शंका नाही.
(out of stock)
MRP ₹140 ₹120 (20₹ Discount)