कथासंग्रह

वाळसरा

(Valsara)

लेखक : आसाराम लोमटे

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

'... लिहिणारा ज्या काळात वावरतो त्या काळाचा त्याच्यावर मोठा प्रभाव असतोच. कितीतरी गोष्टी काळच जन्माला घालतो. म्हणजे सगळ्यांच्या घड्याळात एकाच वेळी विशिष्ट ठिकाणी काटे असतील पण म्हणून सगळ्यांच्या वाट्याला आलेला काळ सारखा नसतो. काळ जे गुंते निर्माण करून ठेवतो ते सगळ्यांच्या वाट्याला सारखे येतील असेही नाही. लेखक आपल्या कुवतीनुसार हे गुंते उकलण्याचा, काळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो... आपला काळ आणि आपला भवताल यातले आशयद्रव्य घेऊनच लेखकाला रचनेचे शिल्प साकारावे लागते. ज्या भूमीवर आपण उभे आहोत तेथून प्रश्नांचे असंख्य भुंगे निघत आहेत याची जाणीव एक लेखक म्हणून त्याला नेहमीच अस्वस्थ करते. अशा साऱ्या वास्तवाचा पट भोवती असतो आणि त्याचा एक अदृश्य दाबही मनावर असतो. जे भोवतीचे वास्तव आहे ते अगदी जसेच्या तसे 'कार्बनकॉपी' प्रमाणे उतरवता येत नाही. या वास्तवाचा अन्वय लावण्याची लेखकाची स्वतःची एक रीत असते. वास्तवाच्या पटलावर टोचणारे, आतून जखमी करणारे जे असते ते त्याचा सदैव पाठलाग करते. रोखठोक, जाडेभरडे असे वास्तव शब्दात उभे करताना असंख्य तपशील असतात. या तपशिलांच्या विणकामात काही धागे आंतरिक करुणेचेही असतात... किंबहुना तेच महत्त्वाचे असतात.

- आसाराम लोमटे (लिहिण्यामागची 'भूमि'का या लेखातून)


MRP ₹300 ₹270 (10% Discount)