
(Vivade Vishade Pramade Pravase)
लेखक : प्रशान्त बागड
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
प्रशान्त बागड यांच्या कथांची शीर्षक लक्ष वेधून घेतातः 'एक स्पष्ट गोष्ट', 'दौत, शाई, टाक' आणि यावरही कडी म्हणजे 'भाषिक आणि साहित्यिक विश्लेषण', 'छंदोभंग', 'मायथळ फेलो' आपल्याला जाणवत की कथेमधून काहीतरी निराळ करण्याची बागडाची आकांक्षा आहे.
सर्वसाधारणपणे कथेला कृतक् कथेचा आविर्भाव असतो बागड हे करायचं नाकारतात. कथेच कथापण खरवडून-खरवडून त्याच्या आत काय आहे हे पाहण्याची बागडांची ईर्ष्या आहे. त्यांच्या कथा बुद्धिवादी व चिंतनपर आहेत त्यामुळे त्यांची घाटणी काव्यात्म होते. कथेला नवेपणा देणारे हे घटक आहेत. मराठी कथेला अशा प्रकारे पुनरुज्जीवन देण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ, 'तलावातील चांदणे' असेल किवा 'केसाळ काळभोर पिल्लू' असेल. यामुळे बागड हे लक्षणीय कथाकार ठरतात.
मराठी कथा बदलून टाकण्याचं सामर्थ्य बागड यांच्या कथेत आहे.
- विलास सारंग
MRP ₹135 ₹120 (15₹ Discount)