कवितासंग्रह

औटघटकेची युगांतरं

(Autghatakechi Yugantar)

लेखक : प्रविण अक्कानवरू

प्रकाशन : हस्ताक्षर प्रकाशन गृह

प्रविण अक्कानवरू यांच्याशी माझी ओळख नाही. त्यांची कविताही मी याच्याआधी वाचलेली नव्हती. त्यांची 'औटघटकेची युगांतरं' या संग्रहातली कविता वाचताना मी चकित झालो आणि हादरूनही गेलो. चकित अशासाठी की हा इतका चांगला (1) कवी आपल्याला माहीत कसा नव्हता ? मराठी लिरिकल कवितेची समज स्वतःत पूर्णतः रुजवून जगण्याच्या नव्या कोलाहलातील हलाहल तिच्यात भरले की जे काही होईल ते म्हणजे ही कविता. तिच्यातून प्रकट होणारा अनुभव माणूस म्हणून आपल्याला हादरवून टाकणारा आहे, सुन्न करणारा आहे. दिवसाला विचारू नयेत प्रश्न मागू नयेत उत्तरंही रात्रीकडून धमन्यांची सुस्तावलेली धामण पडू द्यावी निपचित निसर्गनियमानं वाढत जाणारा चंद्रकोरीचा आकार न्याहाळत सोलत राहाव्यात निरर्थकाच्या शेंगा रात्रभर किंवा धुक्यांमध्ये धूर किती हा गोड शब्दांची गुडगुडी जिव्हाराला जळू चिकटला रक्ताविना रिक्त कुडी या कवीला आणि कवितेला सलाम ! आजच्या आपल्या वर्तमानातील जगण्याचा दाह आणि त्याची धग प्रकट करणाऱ्या या कवीची जागा मराठी सारस्वतात नक्की झालेली आहे. - रंगनाथ पठारे

(out of stock)

MRP ₹200 ₹160 (40₹ Discount)