(Ekonisavya Shatkatil Marathi Gadya Khand 2)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
मराठी गद्याच्या १९व्या शतकात झालेल्या विकासक्रमाचा हा द्विखंडात्मक आलेख आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात हे शतक कमालीचे समृद्ध आणि संपन्न आहे. त्याच्या या श्रीमंतीची छाप मराठी गद्यावरही ठळकपणे दिसून येते. राजकीय गुलामगिरीला येथील जनतेकडून वेळोवेळी दिल्या गेलेल्या बदलत्या प्रतिसादाच्या पाऊलखुणाही तेव्हाच्या मराठी गद्यात पाहायला सापडतात.
या दुसऱ्या खंडात भारतीय राजकारणातील स्वदेशीच्या तत्त्वाचे जे भाषिक पडसाद मराठी गद्यलेखनाच्या क्षेत्रात उमटले त्यांची नोंद घेतली गेली आहे. भाषेचे सौष्ठव, वैचारिक टोकदारपणा, देशी परंपरांचे पुनरुज्जीवन आणि सामाजिक भाषाभान ही या काळातील मराठी गद्याची लेणी म्हणता येतील. चिपळूणकरांचे भारदस्त व स्वाभिमानपोषक गद्य, टिळक-आगरकरांचे अर्थगंभीर व ओजस्वी गद्य हे सारे काही या कालखंडातील लेखनाने मराठी वाचकांना भरभरून दिले. प्रारंभिक काळात इंग्रजीच्या प्रभावाखाली मराठी गद्यपरंपरेचे जे अपक्षरण झाले होते ते थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न शतकाच्या उत्तरार्धात झालेले दिसून येतात. समाजातील विविध जातीजमाती व समुदाय लिहिते झाल्यामुळे मराठी गद्याला एक विलोभनीय बहुविधता व तळागाळातील भाषेचे सत्त्व या काळात लाभले होते.
(out of stock)
MRP ₹120 ₹95 (25₹ Discount)