कवितासंग्रह

गाभ्यातला हलकल्लोळ

(Gabhyatala Halkallol)

लेखक : वाल्मिक विष्णू वाघमारे

प्रकाशन : हस्ताक्षर प्रकाशन गृह

भडकलेल्या वणव्यात जळत जाणारे दिवस आणि भवतालातली ओसाड रखरख वाट्याला आल्यानंतरही पाझरत जाणारी ही कविता आहे. हा पाझर आहे ठिबकणाऱ्या दुःखाचा, व्याकुळ तृष्णेचा आणि प्रार्थनेच्या ओलाव्याचाही... तटा तटा तुटत जाणाऱ्या नात्यांना जपतानाची या कवितेतील कासावीशी संवेदनशील मनाला छिलून काढते. आतून कैकदा उन्मळून पडल्यानंतरही तग धरून राहण्याची जबर आकांक्षा या कवितेत एखाद्या उबदार धगीसारखी सतत जाणवते. जगरहाटीतल्या कडवट अनुभवांचे जहर पचवल्यानंतरही स्वतःला शुद्ध, निर्वैर आणि नितळ ठेवण्याची चाह कसोशीने जपणारी ही कविता आहे. 'दुःखच करुणेला जन्म देईल' यावर विश्वास असलेला हा कवी आहे. या कवितेच्या गाभ्यात गदगदुन आलेलं दुःख असलं तरी या कवितेवर पडलेलं निळसर करुणेचं प्रतिबिंब विलक्षण लोभस आहे, ते चांदण्यासारखं वाचकांच्या मनावर पसरत जातं. हा 'गाभ्यातला हलकल्लोळ' वेदना आणि प्रार्थना या दोहोंनाही कवेत घेणारा असल्याची अनुभूती वाचकांना नक्कीच येईल ! - आसाराम लोमटे

(out of stock)

MRP ₹260 ₹205 (55₹ Discount)