कवितासंग्रह , अनुवादित

गिलमगेश

(Gilamghesh)

लेखक : डेव्हीड फेरी

प्रकाशन : साहित्य अकादमी

डेव्हीड फेरी ह्यांच्या गिलगमेश ह्या महाकाव्याचे शरद नावरे ह्यांनी केलेले हे मराठी भाषांतर. मराठी वाचकांना गिलगमेश हे मानवी इतिहासातील पहिले महाकाव्य फारसे परिचित नाही. सुमेरियन अक्कादियन संस्कृतीमध्ये इ.स. पू. २५०० वर्षांपूर्वी ते हळूहळू आकारास आले. माणूस, निसर्ग आणि देव कल्पना यांच्यातील नात्याचे एक सशक्त प्रारूप गिलगमेश महाकाव्यात पुढे येते. होमोसेपियन या प्राणीअवस्थेतून मानुषीकरण होण्याच्या प्रक्रियेतील बऱ्यापैकी स्थिर आणि परिणित अवस्थेचे दर्शन या महाकाव्यात घडते. मानव अस्तित्वाच्या सांतत्वाच्या अजूनही न सुटलेल्या कोड्याला थेट भिडण्याचा विलोभनीय प्रयत्न हे या महाकाव्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. अस्तित्वाच्या गाभ्याला ते स्पर्श करते. न्याय, प्रेम, बंधुत्व द्वेष, हिंसा, क्रौर्य-क्षमा, करुणा, धैर्य अशा मानवी गुणावगुणांचे आद्यदर्शन इथे घडते आणि युगप्रणित समूह नेणीवेच्या सलगत्वाचा पडताळा येतो. गिलगमेश साजरे करते मनुष्य जीवनाची सांतता आणि निसर्गपाशातून मुक्त झालेल्या नागर समाजातील उच्चतर जीवनोपभोग. आपल्या अस्तित्वाची मुळे किती लांबवर आणि खोलवर पसरली असतात याचा आश्चर्यकारक प्रत्यय गिलगमेश सारख्या प्राक्कथा, मिथक आणि महाकाव्यांतून येत राहतो.

(out of stock)

MRP ₹175 ₹140 (35₹ Discount)