
(K. Sacchidanand Yanchi kavita)
लेखक : के. सच्चीदानंद
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
के सच्चिदानंदन यांची कविता एकाच वेळी भूत, वर्तमान, भविष्याचा वेध घेते. तीव अनुभव आणि प्रभावो भाषा, उच्च प्रतीची कल्पनाशीलता यातून त्यांच्या कवितेचे सर्जन होते. त्यांच्यासाठी व्यक्ती आणि समष्टीतील सीमारेषा पुसट झालेल्या असतात. ते जसे मनात खोलवर डोकावतात तसेच विराट व्यापक दृष्टोतून समाजाकडे बघतात. त्यांची कविता कुठल्याही एका विचारधारेशी, संप्रदायाशी, समाज-संस्कृती-धर्म-राजकारण यांच्या सिद्धांताशी बांधलेली नाही उदारमतवादी, मानवतावादी, बहुसांस्कृतिक, प्रखर नैतिक जाणीव असलेली, सर्व धर्माशी सहिष्णुतेनेच नव्हे तर त्याच्याही पुढे जाऊन आदरभावनेने ओतप्रोत अशी आधुनिकता आणि आधुनिकोतरता याच्याशी नाते सांगणारी त्यांची कविता खऱ्या अर्थाने समकालीन भारतीय कवितेचे प्रतिनिधित्व करणारी आहे.
२०११ च्या नोबेलपुरस्काराच्या (साहित्य) यादीत के. सच्चिदानंदन यांना दहावे मानांकन मिळाले होते.
(out of stock)
MRP ₹150 ₹125 (25₹ Discount)