
(Kankankudri Tuntuntari Tandatunda)
लेखक : विलास पाटील
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
घोड्यांच्या लोकविलक्षण जगाचे दर्शन विलास पाटील यांच्या कवितेत आहे. घोडा आणि मानवसमूह यांच्यातील सहप्रवासाच्या अनंत छटा 'कनकन्कुद्री तुनतुन्तारी टप्डाटुण्डा' या दीर्घकवितेत आहेत. घोडा व मानव यांच्यातील अवस्थांतरणांच्या जाणीव-गोफांमधून टप्डाटुण्डा'चे अभिनव असे रिंगण आकाराला आले आहे. घोडा आणि ग्रामसंस्कृतीतील जाणीवनेणिवेचा अनोखा नकाशा त्यामध्ये रेखाटला आहे. घोड्याच्या विविध अवस्थांपासून ते त्याच्या मुक्तियात्रेचा प्रदीर्घ पट या कवितेत आहे. 'मानूस झाला ओडा लाग्ला झाग्रातीऽपाटी' अशा वर्तमानातील विरोधप्रतिमांनी घोड्याचे विद्य अधिक उठावदार केले आहे. घोड्याविषयीचे हे समूहगान आहे. हे अच्चदर्शन संस्कृतीच्या बहुधारांना उजागर करणारे आहे, त्यामुळे ते सतत समाजसंस्कृतीसंदर्भात व्यक्त झाले आहे. लोकपरंपरेने जोपास-जोजावलेल्या घोड्याच्या विविधरंगी प्रतिमांचे त्यावर संस्कार आहेत.
हे कथनकाव्य व्यक्ती, प्रदेश, संस्कृती व अनोख्या बोलीरूपांनी सजविले आहे. त्यात घोड्याशी संबंधित पुराकथांचा कल्पक सर्जनशील असा वापर आहे. ध्वनी, शब्द आणि वाक्यमोडणीचे अनेक प्रयोग आहेत. व्यक्ती, परिसर व सीमावोली तसेच निव्वळ ध्वन्यानुकारी उच्चाररूपांचा थक्क करणारा वापर या कवितेत आहे. हाल्गी वाजताळा 'टप टप टप टप',
'टप्डाटुण्डा टप्डाटुण्डा', 'डंगडंग डंग', 'डॅग्चिक चिक्डंग' आणि 'पुळळूम्छुकलूम्खुळ्ळूम्खुळ्ळूम्' अशा टापा-वाद्यवृंदी ध्वनींचा विलोभनीय असा नादमेळ साधला आहे. घोड्यांच्या अनेकरंगी प्रतिमांना दृश्यात्मकतेच्या अनेकमिती चलरिमाणातून बहुआयाजीपण प्राप्त करून दिले आहे. देशी लोकबंध आणि बोलणे यास केंद्रवर्ती ठेवून टापांचा माहोल साजिवंत केला आहे, तो मराठीत अपूर्व आणि अपरिचित आहे. भाषेच्या अपरिचित वि-रचनेचे वेगळे भान त्यामध्ये आहे. मराठी काव्यसंस्कृतीला अनघड व अपरिचित वाटावा असा या कवितेचा रूपबंध आहे. भाषाविज्ञानालाही आव्हानप्रद ठराया, अशा ध्यनिभाषारूप खेळाचा चमचमता भाषावकाश या काव्यरूपात आहे. 'गेला घोडा न्हायल्या टापा' या काळविस्मृतीचे निनादभान देणारी, ही आगळी-अंग्ळी कविता आहे.
- रणधीर शिंदे
MRP ₹450 ₹380 (70₹ Discount)