(Khel)
लेखक : नामदेव ढसाळ
प्रकाशन : प्रास प्रकाशन
गहन आणि गूढ यांच्या पलीकडेही असतो
माणूस एक प्रलयंकारी आच
या निच्छलात आपणच आपणाला
शोधून काढायचं
यासारखं दुसरं सुख नाही
हे
नामदेव ढसाळ
तुम्हांला ठाऊक नसलेले
तुमच्या ध्यानीमनी नसलेले
तुमच्या स्वप्नीहि नसलेले -
ते कोणता
खेळ
खेळतायत ?
मुद्रणसुलभ अस्तित्वापेक्षाही
तू आहेस याहून अजून काही
त्याला व्यापून टाकणं
हे असं राहूनच जातं हरघडी
(out of stock)
MRP ₹200 ₹200