कवितासंग्रह

लॉकडाऊनमधील क्वारंटाईन : स्वगते खंड १

(Lockdownmadhil Quarantine : Swagate Khand 1)

लेखक : श्रीधर तिळवे नाईक

प्रकाशन : हस्ताक्षर प्रकाशन गृह

बाहेर लॉकडाऊन आणि आत क्वारंटाईन अशी आजच्या काळाची विचित्र वस्तुस्थिती आहे. अशा वस्तुस्थितीच्या काळात स्वगतं म्हणण्याशिवाय कुठलाच पर्याय हाताशी उरत नाही. जीवघेण्या आजाराची पसरलेली साथ आणि सोबत मात्र कुणीच नाही. अशा एकटेपणाच्या बंदिस्त अवकाशात स्वगतांव्यतिरिक्त कवीपुढे अन्य मार्गही उपलब्ध नाहीत. म्हटलं तर कवीच्या सगळ्याच कविता स्वगतंच तर असतात. पण श्रीधर तिळवे नाईक यांची 'लॉकडाऊनमधील क्वारंटाईन स्वगते' ही काळाची कदाचित देणगीच म्हणावी लागेल. कारण भोवताली मृत्यूचे तांडव, भयग्रस्तता, संशय, नवी अस्पृश्यता, हतबलता, एकटेपणाची अनाकलनीय लिपी, जगण्यासाठी चाललेला जीवघेणा संघर्ष अशा सगळ्या मिती या स्वगतांनी व्यापून राहिलेल्या आहेत. आत्यंतिक गुंतागुंतीचा समाजव्यवहार आणि तितकीच गुंतागुंतीची व्यक्तिगत स्थिती यातून निर्माण झालेली ही कविता मराठीमध्ये काही वेगळेच आयाम निर्माण करेल असा विश्वास वाटतो. कोरोनासारख्या भीषण संकट काळाला पुरजोर प्रतिसाद देणारी ही एकमेव कविताकृती म्हणावी लागेल. मराठी कवितेच्या परिणामकारकतेचा रीच कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर श्रीधर तिळवे नाईक यांनी महाकाव्यासाठी आपले कवीपण पणाला लावावे हे वाखाणण्यासारखे आहे. या संग्रहात अनेक आवाज, अनेक उसासे, अनेक संवेदनस्वभाव, भाषेचे गोफ आणि अनेकांच्या करुण कहाण्या मिसळल्याने हे काव्य महाकाव्याच्या प्रांतात सहज प्रवेश करते.

(out of stock)

MRP ₹399 ₹340 (59₹ Discount)