कवितासंग्रह

निरंतर

(Nirantar)

लेखक : सतीश काळसेकर

प्रकाशन : पपायरस प्रकाशन

लघुनियतकालिक चळवळीतले ज्येष्ठ कवी सतीश काळसेकरांचं २४ ऑगस्ट २०२१ रोजी अचानक निधन झालं. ग्रंथप्रेम, वाचनप्रेम, नव्या पिढीतल्या लेखकांविषयीची स्वागतशील वृत्ती, भटकंतीचं वेड आणि या सर्वांच्या मुळाशी असलेली डाव्या विचारांशी बांधिलकी–हे काळसेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. ‘इंद्रियोपनिषद’ पासून ‘विलंबित’ पर्यंत विस्तारित आणि सखोल होत गेलेल्या त्यांच्या कवितेने एकंदर मराठी कवितेवर आपली मुद्रा उमटवली आहे. कविता हाच त्यांचा श्वास होता. ‘विलंबित’ (१९९१) नंतरच्या गेल्या तीस वर्षांतल्या त्यांच्या कवितांचा संग्रह करण्याची त्यांची तयारी गेली दीड-दोन वर्षं सुरू होती, त्यातच त्यांचं निधन झालं. तत्पूर्वी त्यांनी संग्रहाची टंकलिखित प्रत डॉ. नितीन रिंढे यांच्याकडे सुपूर्द केली होती. या संग्रहाला काळसेकरांनी स्वत:हून काही नाव दिलं नव्हतं. काळसेकर यांच्या वाचन-लेखन-जीवन प्रवासातले जिवलग मित्र श्री. जयप्रकाश सावंत, गणेश विसपुते, प्रफुल्ल शिलेदार, नितीन रिंढे यांनी चर्चा करून संग्रहातीलच एका कवितेच्या शीर्षक असलेले 'निरंतर' हे नाव नक्की केले.

(out of stock)

MRP ₹325 ₹275 (50₹ Discount)