
(Ravindranathanchya Sahawasat)
लेखक : मैत्रेयी देवी
प्रकाशन : वॉल्डन
श्रीमती मैत्रेयी देवी यांनी 'मंग्पूते रबीन्द्रनाथ' नावाचे, कविश्रेष्ठ रवीन्द्रनाथ ठाकूर यांच्या हृद्य आठवणींविषयीचे एक नितांत सुंदर पुस्तक बंगालीत लिहिले आहे. रवीन्द्रनाथांच्या नाना छटा असलेल्या स्वभावविशेषांचे अनोखे दर्शन या पुस्तकात घडते. 'मंग्पूते रबीन्द्रनाथ'चा हा मराठी अनुवाद 'रवीन्द्रनाथांच्या सहवासात.' 'रवीन्द्रनाथांच्या सहवासात' हा अनुवाद छान झाला आहे. एका महाकवीच्या सहवासाची ही कहाणी आहे. अतिशय हृद्य असे हे पुस्तक मराठीत येत आहे याचे मला फार समाधान वाटले. - पु. ल. देशपांडे 'रवीन्द्रनाथांच्या सहवासात' हा अनुवाद वाचला. वाचताना हरवून गेलो. अनुवाद उत्तम उतरला आहे. कितीतरी प्रसंगांतला गोडवा आणि हळुवारपणा मैत्रेयी देर्वीनी अचूक शब्दांत पकडला आहे. शैलीही ओघवती वाटली. अनुवादातून ही सारी प्रचीती घडविल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. - आनंद अंतरक रवीन्द्रनाथांबद्दल अक्षरशः असंख्य पुस्तके आहेत; पण 'मला रवीन्द्रनाथांवरील फक्त एक आणि एकच पुस्तक वाचायचे आहे.' असे मला कुणी म्हणाले, तर मी निःशंकपणे या पुस्तकाची शिफारस करीन. - बा. भ. बोरकर
(out of stock)
MRP ₹400 ₹340 (60₹ Discount)