
(Sen Sayi Ves)
लेखक : वीरा राठोड
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
वीरा राठोड यांची कविता भोवतीच्या गोधळाचा चक्रव्यूह भेदून उजेडाच्या दिशेने झेपावते बहिष्कृतांना खाडववनात जाळणाऱ्या हिटलरी इतिहासावर विद्रोहाचा ज्वालामुखी ओतते अन्यायात कुढणाऱ्या वर्तमानाच्या हातात शोषणविहीन जगाची युद्धनैतिकता ठेवते अंधाराच्या पलटणीत भरती होणारा उजेड पाहून कवीच्या जिवाला आग लागते.
अनंत पातळ्यांवर धुमाकूळ घालणाऱ्या अंतर्विरोधाचे वाचन आणि पुनर्वाचन कवी करतो, हे पुनर्वाचन शब्दांच्या हातात ठेवतो त्यातून त्याची ज्वलंत कविता जन्माला येते. ही कविता जीवनाची जळती स्पंदने टिपताना अधिकच भेदक होते स्वच्छ माणसाची झगमगती प्रतिमा जन्माला घालण्याचा ध्यास घेणारी ही कविता अनेक नव्या प्रतिमांची चिर्मिती करते आपल्या काळाशी, त्याच्या घुसमटीशी भिडणारी ही कविता स्वतःचे कवितापणही तेजःपुंज करते.
- डॉ. यशवंत मनोहर
(out of stock)
MRP ₹180 ₹145 (35₹ Discount)