कवितासंग्रह

तुही यत्ता कंची?

(Tuhi Yatta Kanchi?)

लेखक : नामदेव ढसाळ

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

कसा विहरू दुःख चोचीत धरून 

किती ठेवू इंद्रियं ताजीतवानी?

किती संभाळू हे बीज ?

कंचा खूरहीन घोडा 

नृत्य करतो या जखमेवर ?

हे अनामिका, वाहून ने या चंद्रवेणा 

बघ ही दुःखाची व्हायोलिन 

एक गूढ पांघरून 

झोपलेय स्वप्नवृक्षाखाली 

शताब्दीची चादर पांघरून

धड पहाटेचाही उदय होत नाही 

धड पाखरेही निवांत झोपी जात नाहीत

कंच्या शहाण्यांनी लिहून ठेवलीय 

ही लोफर मेलडी ?

MRP ₹195 ₹175 (20₹ Discount)