
(Abujhmadche Anunad)
लेखक : नरेंद्र
प्रकाशन : पपायरस प्रकाशन
नरेन्द्र यांची ‘बस्तर डिस्पॅचेस’ (हार्पर कॉलिन्स, २०१८), ‘अ सेन्स ऑफ होम’ (हार्पर कॉलिन्स, २०२०) ही इंग्रजी आणि ‘आदिवासी लोक-समाज: कुछ अनुभव, कुछ अनुभूति’ (नमस्कार बुक्स, २०२२) हे हिंदी, अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. (हे मराठी भाषांतर पूर्ण झाल्या नंतर मार्च २०२४ मध्ये ‘लॅण्डस्केप्स इन विल्डरनेस’ हे त्यांचं आणखी एक इंग्रजी पुस्तक हार्पर कॉलिन्स कडून प्रकाशित झालं). प्रस्तुत मराठी पुस्तकासाठी त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकं, त्यांनी पाठवलेले दोन अप्रकाशित लेख, एक व्हिडिओ, अशा सगळ्याचा आधार घेतला आहे. इंग्रजी पुस्तकांमधला काही भाग हिंदी पुस्तकातही आहे, पण काही पूर्ण पणे वेगळी प्रकरणंही त्यात आहेत; तसंच काही वेळा संदर्भ सारखा असला तरी त्या संबंधी कधी हिंदीत तर कधी इंग्रजीत अधिक सविस्तर उतारे आलेले आहेत. हे सर्व विचारात घेऊन आणि लेखकाशी संवाद साधून स्वतंत्रपणे सदर मराठी पुस्तक तयार केलं आहे. यात मुख्यत्वे ‘बस्तर डिस्पॅचेस’ची संहिता आधारभूत मानली आहे, पण ‘अ सेन्स ऑफ होम’मधली काही प्रकरणं आणि हिंदी पुस्तकातली मोजकी प्रकरणं या मराठी आवृत्तीत घेतली आहेत. ‘बस्तर डिस्पॅचेस’ वगळता इतर दोन पुस्तकांचं आशयसूत्र नरेन्द्र यांच्या उत्तर भारतातील गावाशीही जोडलेलं आहे. त्या गावात लहानपणी राहतानाचे अनुभवही त्या मध्ये आले आहेत. पण सदर मराठी पुस्तक मात्र अबुझमाडमधील अनुभवांवर केंद्रित असल्यामुळे इतर दोन पुस्तकांमधली काही प्रकरणं इथे घेताना संपादित केली आहेत; अनेकदा त्या पुस्तकांमधले नुसते काही उतारे इथल्या प्रकरणांमध्ये मिसळले आहेत (गावाविषयीच्या अनुभवांचेही धागे प्रस्तुत मराठी पुस्तकात शेवटच्या प्रकरणांमध्ये सापडतील). शिवाय, तपशिलांची पुनरावृत्ती होऊ नये असाही विचार संपादनावेळी केला. मराठी पुस्तकातील प्रकरणांचा क्रमही भाषांतरकाराने लेखकाच्या परवानगीने वेगळा केला आहे. थोडक्यात, मराठीतलं हे पुस्तक नरेन्द्र यांच्या एकाचएका इंग्रजी वा हिंदी पुस्तकाचं भाषांतर नसून एकंदर त्यांच्या उपलब्ध झालेल्या मजकुरांमधून निवड करून, त्यात संपादन करून तयार केलेलं हे स्वतंत्र भाषांतरित पुस्तक आहे. शिवाय, मराठी भाषांतरकाराने त्यांच्या या मजकुराविषयी सहमतीचे व असहमतीचे मुद्दे मांडणारं टिपण या पुस्तकात वाढवलं आहे.
(out of stock)
MRP ₹499 ₹425 (74₹ Discount)