
(Premsadhana)
लेखक : शरद नावरे
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ डॉ. एरिक फ्रॉम यांचे द आर्ट ऑफ लव्हिंग हे पुस्तक जगातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे आणि त्याच्या लक्षावधी प्रती खपल्या आहेत.
प्रेमासाठी प्रत्येक माणूस आतून आसुसलेला असतो. कारण खरे प्रेम हाच मानवी अस्तित्वाच्या मूळ समस्येवर एकमेव तोडगा आहे, माणसाचे आंतरिक दुःख व एकाकीपणावरील उत्तर आहे. पण प्रेम म्हणजे तरी मुळात काय ? वात्सल्य, बंधुप्रेम, वैषयिक प्रेम, स्वतःवरचे प्रेम व ईश्वरावरचे प्रेम या प्रेमाच्या विविध रूपांची वैशिष्ट्ये काय आहेत? खरे प्रेम करण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीत नसण्यामागे कोणती कौटुंबिक व मानसशास्त्रीय कारणे असावी, यांसारख्या प्रश्नांची सखोल चर्चा आहे.
पण प्रेम म्हणजे काही एखादा तात्कालिक भावनिक उन्माद नव्हे, गंमत नव्हे, आपोआप पदरात पडणारी गोष्टही नव्हे. फक्त विवेकी, निकोप मनोवृत्तीच्या, सत्यशील व्यक्तीच प्रेम करू शकतात व निभावून नेऊ शकतात. प्रेमशून्य परिस्थितीतही त्या स्वतःचे मानुष आत्मभान जोपासून असतात. ही माणसे फक्त स्वतःचे व प्रिय व्यक्तींचेच नव्हे तर अखिल मानवांचे जीवन मुक्त, आनंदमय आणि सफल करू बघतात. प्रेमाच्या राज्याची दारे केवल अशाच माणसांसाठी खुली असतात; आणि त्या राज्यात प्रवेश हवा असेल तर स्वतला प्रयासपूर्वक घडवावे लागते, साधना करावी लागते. अशा साधनेची तपशीलवार मांडणी हे या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
शरद नावरे यांनी मराठीत केलेले हे रूपांतर जसे सकस आहे तसेच वाचनीय आणि तरुण मनांना खोलवर स्पर्श करणारे आहे.
MRP ₹220 ₹200 (20₹ Discount)