(Ayodhya)
लेखक : जी. के. ऐनापुरे
प्रकाशन : हस्ताक्षर प्रकाशन गृह
कादंबरी या वाङ्मयप्रकाराने गेल्या दोन दशकात सर्वच वैशिष्ट्यांच्या बाबतीत आपल्या पूर्वसुरींसमोर हाराकिरी पत्करली आहे. या एकाच गोष्टीमुळे लेखकाच्या अंतरंगातील नैतिकतेचा लोप होऊन त्याच्यामध्ये जातीय आणि समूहग्राहकतेची नवी अस्मिता निर्माण झाली. या नव्या ग्राहकी अस्मितेमुळे मराठी कादंबरीचा विकास खुंटल्यासारखा दिसतो. मराठी कादंबरीने ज्या गोष्टी स्वीकारायला हव्या होत्या त्या गोष्टींचा निर्देश करण्यात मराठी समीक्षेचाही फार मोठा दाब राहिलेला नाही. परिणामी आशयाची कोंडी फोडण्यात, त्याला प्रवाहित करण्यात आणि त्याला नव्या पिढीबरोबर जोडून घेण्यात कादंबरीकार अयशस्वी झाले का ? अशा प्रकारचे एक भयचित्र समोर उभे राहिले आहे. या सगळ्या गोष्टींचा एकात्मिक विचार करून जी. के. ऐनापुरे यांची ही कादंबरी अस्तित्वात आल्याचे तिच्या आशयावरून स्पष्ट दिसते. वस्तुतः 'अयोध्या' हे शीर्षकच त्याचा स्पष्ट पुरावा आहे. अयोध्या या एका शब्दामुळे जेवढे काही अनर्थ भारतीय समाजात झाले, त्या सर्व अनर्थांना एका वेगळ्या नजरेने बघत या कादंबरीचा विस्तार झालेला आहे. 'अयोध्या' हे रूपक केवळ अयोध्या-बाबरी यांच्यापुरतेच मर्यादित न राहता ते सबंध मानवी धर्माचे सनातनी वर्तन बनले आहे. या सनातनी वर्तनाचा दंभस्फोट हे या कादंबरीचे शक्तीस्थळ आहे. या शक्तीस्थळाच्या अनुषंगाने काही एक नवा सांस्कृतिक व्यवहार उभा राहील असे मनापासून वाटते.
(out of stock)
MRP ₹1199 ₹960 (239₹ Discount)