कादंबरी

सर्व प्रश्न अनिवार्य

(Sarv Prashna Anivarya)

लेखक : रमेश इंगळे उत्रादकर

प्रकाशन : शब्द

मूल्यमापन ही शिक्षणप्रक्रियेतील एक महत्त्वाची प्रक्रिया असून शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थ्यांत घडून येणारे इष्ट परिवर्तन पडताळण्यासाठी लेखीपरीक्षा हे मूल्यमापनाचे साधन अवलंबले जाते, लेखीपरीक्षेतल्या गुणांवरून विद्द्यार्थ्यांची गुणवत्ता व बौद्धिक उंची आंधळेपणाने मोजली जाते. दहावी-बारावीच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांना आयुष्याचे पुढचे मार्ग निवडण्यासाठी अवास्तव महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण आणि ज्ञान यापेक्षा परीक्षेतले गुण कळीचे ठरतात. मग ते मिळविण्यासाठी कॉपीसारख्या गैरप्रकारांचा सुळसुळाट होतो. 'सर्व प्रश्न अनिवार्य' हो शिक्षणव्यवस्थेतील परीक्षापद्धतीत शिरलेल्या गैरमार्गाची कथा आहे. तसेच ती या व्यवस्थेत होरपळणाऱ्या प्रामाणिक व तत्त्वनिष्ठ शिक्षकाची घुसमट मांडते.

शैक्षणिक पर्यावरण ही जरी या कादंबरीची मुख्य आशयवस्तू असली तरी तिच्या निमित्ताने आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचे अस्वस्थ करणारे वास्तव रेखाटताना लेखकाने समकालीन वास्तवातील मूल्यहऱ्हासाचे, नैतिक अधःपतनाचे भेदक दर्शन घडविले आहे.

MRP ₹300 ₹270 (10% Discount)