(Char Adhyay)
लेखक : रवींद्रनाथ ठाकुर
प्रकाशन : साहित्य अकादमी
"स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचा आवेग आणि स्वरूप फक्त नायक आणि नायिका यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर अवलंबून असतं असं नाही. चारी बाजूंनी होणाऱ्या परिस्थितीच्या आघात प्रत्याघातांवरही ते अवलंबून असतं... एका बाजूला असतो त्याचा आंतरिक आवेग तर दुसरीकडे असतो बाहेरच्या परिस्थितीचा अवरोध. या दोन्ही गोष्टी मिळून त्याच्या संपूर्ण चित्राचं वैशिष्ट्य तयार होतं. एला आणि अतीन यांच्या प्रेमाचं हेच वैशिष्ट्य या कथानकात साकार करायचं होतं.
या प्रेमाचं विशिष्ट नाट्यपूर्ण रूप बंगालच्या क्रांतिकारी चळवळीच्या पार्श्वभूमीवर साकार झालं आहे... या क्रांतीच्या वादळी वातावरणामुळे त्या दोघांच्या प्रेमामध्ये जी तीव्रता आणि जी वेदना निर्माण झाली तिच्यातच या कादंबरीची ओळख आहे." (रवींद्रनाथ ठाकुर - चार अध्यायसंबंधी खुलासा)
राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर आधारलेल्या क्रांतिकारी चळवळीमध्ये अपरिहार्यपणे हिंसात्मक आणि क्रूर प्रवृत्ती जन्माला येतात. त्यामुळे राष्ट्रवादाचा अंतिम सामना मानवतावादाशी असतो. अशा चळवळींना असलेला रवींद्रनाथांचा प्रखर विरोध चार अध्यायच्या कथानकात प्रतिबिंबीत झाला आहे. एला आणि अतींद्र यांच्या प्रेमाची शोकांतिका या क्रांतिकारी चळवळींचा परिणाम आहे.
(out of stock)
MRP ₹90 ₹75 (15₹ Discount)