
(Dr. Mayank Arnav)
लेखक : आनंद विनायक जातेगावकर
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
उच्चभू आईवडिलांनी केलेला आपल्याच तरुण मुलीचा खून ही घटना डॉ. मयंक अर्णव या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. वरकरणी सनसनाटी वाटणाऱ्या या घटनेमध्ये खोलवर शिरून तिच्यामध्ये दडलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक व्यामिश्रतेचा वैध आनंद विनायक जातेगांवकरांनी या नव्या कादंबरीमध्ये घेतला आहे. लैंगिक संबंध मुळाशी असलेल्या हिंसेच्या आशयसूत्राला जातेगांवकर जाणीवपूर्वक नैतिकतेच्या प्रदेशात घेऊन जातात. या प्रवासामधून लेखकाच्या दृष्टीमधील करुणा, सहानुभाव आणि मानवी संबंधांविषयीची संवेदनशीलता यांचे सतत दर्शन होत राहते.
एकाच घटनेकडे पाहाण्याचे वेगवेगळे दृष्टिकोण, घटनांच्या मानसिक संदर्भाना दृग्गोचर करणारी तरल शैली, न्यायालय -पोलीस - माध्यमे - सर्वसामान्य लोक कथक आणि पात्रे यांच्या अनेकविध आवाजांची पीळदार वीण आणि या सर्वांना व्यापून असलेले जीवनव्यवहाराचे प्रगल्भ भान; या सर्व विशेषांमुळे डॉ. मयंक अर्णव समृद्ध झाली आहे.
MRP ₹280 ₹250 (30₹ Discount)