राजकीय , माहितीपर

फेसबुकचा भारतातील खरा चेहरा

(Facebookcha Bhartatil Chehara)

लेखक : परंजय ठाकुरता

प्रकाशन : शब्द

मोबाईल इंटरनेटचा वापर करणाऱ्या जवळपास तीस कोटी भारतीय नागरिकांवर असत्य, अर्धसत्य, चुकीच्या, द्वेषमूलक, विखारी माहितीचा भडिमार होत आहे. आगामी काळातही अशाच आशयाचा भडिमार होत राहणार आहे.

अपेक्षित परिणाम साधण्यासाठी सत्ताधारी उजव्यांची व्हॉट्सअॅप सेना पूर्णपणे शस्त्रसज्ज झाली आहे. फेसबुक आणि त्याच्याशी संलग्न असलेली समाजमाध्यमं, ते दावा करतात तशी निष्पक्ष आणि तटस्थ नाहीत. नरेंद्र मोदी, भाजप व मोदीसमर्थक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या हितसंबंधाचा पुरस्कार करण्यात ही माध्यमं कायदे धाब्यावर बसवून सामील झालेली आहेत. आणि हे २०१४च्या अगोदरपासूनच सुरू आहे.

फेसबुकसारख्या जगातल्या सर्वांत मोठ्या समाजमाध्यम संस्थेच्या कार्यप्रणालीवर जगभरातील विविध देशांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पुस्तकात भारतातील फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या कार्यपद्धतीचा चिकित्सक आढावा घेतला आहे.

MRP ₹300 ₹300