कादंबरी

फत्ते तोरणमाळ

(Fatte Toranmal)

लेखक : दीनानाथ मनोहर

प्रकाशन : शब्द

व्यवस्थेच्या विरोधात उभा राहणारा आणि राजकारणाचे तीव्र भान असलेला नायक हे दिनानाथ मनोहराच्या कादंबरीलेखनाचे 'रोबो'पासूनचे वैशिष्ट्य आहे 'फत्ते तोरणमाळ'मध्येही या वैशिष्ट्याचा प्रत्यय येतो सातपुड्याच्या परिसरातील आदिवासी क्षेत्रामधील जगण्याचा संदर्भ या कादबरीला आहे. 

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील वाजार केंद्रस्थानी ठेवणारी संस्कृती, न्याय, समता, स्वातंत्र्य यांच्या बरोबरीने पर्यावरणाचाही घास घेऊ पाहाते आहे तिच्या विरोधात उभ्या राहू शकणाऱ्या राजकीय जाणिवांचे चित्रण दिनानाथ मनोहरांनी 'फत्ते तोरणमाळ' मध्ये केले आहे. 

गंभीर राजकीय-सामाजिक जाणिवा आणि थ्रिलरचा रूपबंध या गोष्टींना जोडण्याचा प्रयत्न 'फत्ते तोरणमाळ'मध्ये दिनानाथ मनोहर यांनी केला आहे समकालीन राजकारणाचे स्वरूप या प्रयत्नामधून स्पष्ट होते आणि त्याचबरोबर सहूसामान्य वाचकाशी संवादही सहजतेने साधला जातो.


(out of stock)

MRP ₹320 ₹270 (50₹ Discount)