(Kharadchhatani)
लेखक : नामदेव माळी
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
खरडछाटणी ही नामदेव माळी यांची कादंबरी छोट्या शेतकऱ्यांच्या कष्टमय जगण्याचे, त्यांच्या झगडण्याचे, त्यातून निर्माण होणाऱ्या प्राणांतिक आशानिराशेचे उत्कट चित्र वाचकासमोर उभे करते. गळ्याभोवतालचा गरिबीचा फास थोडाफार सैल करण्यासाठी पारंपरिक कोरडवाहू शेतीकडून द्राक्षासारख्या बागायती पिकाकडे वळणाऱ्या शेतकऱ्याची ससेहोलपट होते. तिचे आतून दर्शन खरडछाटणी घडवते. ही केवळ कोण्या एका तानाजीची किंवा त्याच्या कुटुंबाची कथा नाही. ही एका वर्गाची कथा आहे. हा वर्ग आजच्या आधुनिक महाराष्ट्रात अजूनही बहुसंख्य असूनही व्यवस्थेकडून दुर्लक्षित आहे. या वास्तवामागे दडलेले सामाजिक संदर्भ, अभ्यासातून किंवा साक्षात जगण्यातून जाणवलेले तपशील, शेतकऱ्याची पारध करणाऱ्या व्यवस्थेची विविध अंगे, सातत्याने येणाऱ्या संकटांनी आलेली हतबलता आणि तिचा वेगवेगळ्या नातेसंबंधांवर होणारा खोलवरचा परिणाम या कादंबरीमधून सादर केला जातो.
शेतकऱ्याच्या जगण्यातील निर्मितिप्रक्रिया आणि तिला वेढून असणारी विनाशाची आवर्तने या गोष्टी कादंबरीने सामर्थ्याने वाचकापुढे आणल्या आहेत.
- हरिश्चंद्र थोरात
(out of stock)
MRP ₹460 ₹390 (70₹ Discount)