
(Kosalata Gavgada)
लेखक : उल्का महाजन
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
त्रिं. ना. आत्रे यांनी लिहिलेले 'गावगाडा' हे मूळ पुस्तक १९१५ सालचे आहे. गेल्या १०० वर्षात भारताचा ग्रामीण भाग झपाट्याने बदलला आहे. परंपरा, रूढी, वहिवाटी, पूर्वग्रह यावर उभे-आडवे फटके या झपाट्याने मारले आहेत. शतकापूर्वीच्या परिस्थितीतील एकसंधतेला मोठ्या प्रमाणात छेद गेले आहेत. त्यात पहिल्या ७५ वर्षात जेवढे बदल झाले, त्यापेक्षा तीव्र गतीने बदल गेल्या २०-२५ वर्षांत झाले आहेत. सरंजामी व्यवस्था ते औद्योगिक वित्तीय भांडवलशाही, असे तिहेरी स्थित्यंतर झाले आहे. या प्रवासात गाव कसे बदलते आहे, हे गावकऱ्यांच्या आठवणींतून समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
MRP ₹320 ₹285 (35₹ Discount)