(Os Nila Ekant)
लेखक : जी. के. ऐनापुरे
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
ओस निळा एकान्त म्हणजे मध्यमवर्गात दाखल झालेल्या समकालीन आआंबेडकरी जनतेने स्वतः समोर धरलेला आरसा आहे. शोषणाचे कथन आता आत वळले आहे. ही अंतर्मुखता कठोर आत्मचिकित्सेपर्यंत आणि अंतिमतः आत्मभानापर्यंत पोहोचते का हाच खरा प्रश्न आहे.
स्त्रीपुरुष नातेसंबंधांचे नवे आयाम, कुटुंबसंस्थेला आलेली अवकळा, आधुनिकता आणि धम्म यांच्या आविष्कारपद्धतींविषयीचे सभ्रम, सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही पातळ्यांवरची मूल्यात्मक पडझड या साऱ्या प्रक्रियांच्या ताण्याबाण्यानी कादंबरीचा पट विणला आहे.
सावगावे, सारनाथ, सातकरनी, कौलगेकर इत्यादी पात्रांच्या जगण्याच्या परस्परांना छेदणाऱ्या कथारेषा आणि त्याच्या परस्परभिन्त्र दृष्टिकोणांचा कोलाज यांतून एका सामाजिक-सांस्कृतिक अवस्थेचे चित्र उभे राहते. कोणतीही खोली नसलेल्या, पृष्ठस्तरावर तरंगणाऱ्या तात्त्विक चर्चा आणि प्रत्यक्षातल्या दांभिक, भ्रष्ट व्यवहाराने जगण्याला आलेली सर्वंकष ओसाडी हे कादंबरीचे मुख्य विषयद्रव्य आहे. इथे अर्थपूर्णतेच्या शोधापेक्षा अर्थसत्तेच्या वाटा चोरवाटा शोधणेच महत्त्वाचे ठरते. समष्टीकडून 'निळ्या एकान्ता'कडे वळताना अन्याय्य व्यवस्थेविषयीची संवेदनशीलता पूर्णपणे अदृश्य झाली आहे. तात्कालिक उपभोगाला, अनैतिक विनिमयाला अधिमान्यता देणाऱ्या समकाळाने आधुनिकतेच्या, जातिअंताच्या आणि समतेच्या कथनाला दिलेले हे आव्हान आहे. अर्थात, या परिस्थितीचे विश्लेषक निदान करण्याची किंवा तिच्याविषयी नैतिक भूमिका घेणारे विधान करण्याची जबाबदारी कादंबरीने वाचकांवरच सोपवली आहे.
(out of stock)
MRP ₹600 ₹510 (90₹ Discount)